महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, २८ जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्हयातील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पेपर क्रमांक एकसाठी १ हजार ९०३ उमेदवार, तर पेपर क्रमांक दोनसाठी २ हजार २०९ उमेदवार असे एकूण ४ हजार ११२ उमेदवार बसणार असल्याची माहिती जिल्हा परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. जिल्ह्यात ४ हजार ५०१-कासार्डे हायस्कूल कासार्डे, ४ हजार ५०२- कणकवली कॉलेज कणकवली, ४ हजार ५०३- विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली, ४ हजार ५०४ कुडाळ हायस्कूल कुडाळ, ४ हजार ५०५- शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा, ४ हजार ५०६- एस. एम. हायस्कूल कणकवली, या सहा परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीची परीक्षेच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा नियोजनावर चर्चा करण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या पूर्वतयारीबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी दिली.












