कोकणशाही न्यूज ब्रेकींग
ब्युरो न्यूज २८
डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय मच्छीमार जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी भारताने श्रीलंकेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेच्या कार्यवाहक राजदूताला परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. गोळीबाराच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘आज सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ १३ भारतीय
मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाने गोळीबार केला. यामध्ये पाच भारतीय मच्छीमार जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जाफना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाफना येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जखमी मच्छिमारांची भेट घेतली.










