कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून लवकरच साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सावंतवाडी येथे लवकरच साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी दिली. दरम्यान साहित्य परिषदेच्या माध्यमातून यावर्षीपासून कर्णिक यांच्या नावाने आदर्श साहित्य कार्यकर्ता पुरस्कार दिला जाणारअसल्याची घोषणा यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी केली. करूळ ग्रंथालय येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली.यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर, लेखिका उषा परब, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, कवी रुजारियो पिन्टो, आनंद वैद्य, सचिव कदम, खजिनदार भरत गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष वृंदा कांबळे, कणकवली तालुकाध्यक्ष माधव कदम, सुभाष गोवेकर, स्नेहा फणसळकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. नेरुरकर, हायस्कूलचे संचालक गणेश जेठे, ॲड. मंदार म्हस्के आदी उपस्थित होते.यावेळी कर्णिक पुढे म्हणाले, मला जो पुरस्कार मिळाला आहे तो खऱ्या अर्थाने कोकण मराठी साहित्य परिषदेचा आहे . विश्व साहित्य संमेलनात माझा सन्मान होणार आहे हा खरा सन्मानया परिषदेच्या सर्वांचा आहे, असे मी मानतो.