सावंतवाडी, दि- २३
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सावंतवाडी भटवाडी येथील ब्राह्मण देवालय येथे गुरुवार, २३ जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थ पादुकांच्या पालखीचे आगमन होणार आहे. यानिमित्त दुपारी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर आरती, सायंकाळी चार वाजता सावंतवाडी शहरात पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सायंकाळी सात वाजता आरती व महाप्रसाद होणार आहे. रात्री आठ वाजता निरवडे येथील दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. २४ जानेवारी रोजी पहाटेपासून सकाळी आठपर्यंत धार्मिक कार्यक्रम व भाविकांसाठी पादुकांचे दर्शन उपलब्ध असणार आहे. स्वामी भक्तांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.










