गोवा बनावटीची दारू विक्री एकास अटक..

सावंतवाडी : दि २२

गोवा बनावटीची दारू विक्री केल्याप्रकरणी सांगेली येथे एकाला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहे.त्याच्याकडून तब्बल ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमित गणू मातोंडकर (वय ३९, रा. सांगेली जायपीवाडी) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चंद्रकांत रमेश पालकर यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.