कुडाळ तालुक्यातील 63 बूथवरील 18 सरपंच, शक्ती केंद्रप्रमुख आणि 55 बुथप्रमुखांसह भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि विविध पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी जि.प. अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, भाजप ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजप तालुकाध्यक्ष देवेंद्र सामंत, कसाल सरपंच राजन परब, पांडू मालणकर, दीपक नारकर, ओंकार तेली आदींसह विविध भाजपा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पक्ष संघटना वाढविण्याची दिलेली जबाबदारी सांभाळून शांततेत गाव तेथे शिवसेना शाखा आणि संघटना वाढविण्यासाठी प्रत्येकाने काम करा. येत्या पाच वर्षांत राज्यात आदर्शवत कुडाळ विधानसभा मतदारसंघ बनवूया. प्रत्येकाने संघटनात्मक काम करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत अशी शिसेना उभी करूया, असे प्रतिपादन आ. निलेश राणे यांनी या केले.










