देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील रुग्णांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम

देवगड: दि २०

देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील रुग्णांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गेली दोन वर्ष देवगड येथील एकमेव ऑर्थोपेडिक सर्जन डॉ तन्मय आठवले हे मंत्री नितेश राणे यांच्या आग्रहाला मान देऊन देवगड ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी नऊ ते बारा या वेळात मोफत तपासणीसाठी उपलब्ध राहतील. डाॅ तन्मय आठवले हे संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड ट्राॅमा पुणे येथील पॅनल डॉक्टर आहेत. त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन , इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन , महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन, बॉम्बे ऑर्थोपेडिक सोसायटी, सिंधुदुर्ग ऑर्थोपेडिक सोसायटी आणि इंडियन ऑर्थोस्कॉपिक सोसायटीचे सदस्य आहेत. शासकीय रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आठवड्यातून दोन दिवस शासनाकडून कोणतेही मानधन न घेता आपली संपूर्णपणे मोफत सेवा देऊ केली आहे.सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील व देवगड ग्रामीण रुग्णालयाचे एम एस डॉ पाटोदेकर सर यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. अधिकाधिक रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.