📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
रत्नागिरी : दि १७
‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही लोकसहभागातून आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 938 वनराई, विजय, कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. यावर्षी 8 हजार 685 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे., जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गतवर्षी दीडशेपेक्षा जास्त गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते. यामुळे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे दरवर्षी जिल्ह्यात कच्चे, वनराई व विजयी बंधारे बांधण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार यावर्षीही जिल्ह्यात 8 हजार 685 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गतवर्षी 6 हजार बंधारे बांधण्यात आले होते. यामुळे थोड्याफार प्रमाणात पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली होती.गावातून वाहणारे नाले, वहाळ, उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. लोकसहभाग व श्रमदानातून हे बंधारे उभारले जात अ कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या विजयी बंधाऱ्याचे मॉडेल पाणी साठवून ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरत आहे. सिमेंटच्या पोत्यांचा उपयोग करून हे बंधारे उभारले जात आहेत. यंदा अगदी ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस सुरू होता. त्यामुळे गावागावांतून वाहणाऱ्या नदी नाल्यांचे प्रवाह वेगवान होते परिणामी प्रत्यक्ष बंधारे बांधण्यासाठी यावर्षी थोडा उशीर झाला.