सिंधुदुर्ग ; नारळच्या दरात दुप्पटीने वाढ !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |


✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग

सिंधुदुर्ग : दि. १७

स्थानिक बाजारपेठेत नारळांच्या किमंती गगनाला भिडल्या आहेत. हवामानात होणारे सतत बदल, थंडीचा लहरीपणा आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव यामुळे नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. परिणामी, नारळाचे दर कमालीचे वधारले आहेत. बाजारात सध्या नाराळची किंमत 50 रू. पर्यंत पोहोचली आहे. यामुळे गृहीणींचे घरगुती बजेटही बिघडले आहे.
कोकणात जेवणासाठी तसेच देव व धर्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर नारळाचा वापर होतो. शिवाय कोकणातील किनारपट्टी भागातील जमीन व खारी हवा नारळ लागवडीसाठी पोषक आहे. यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नारळाची लागवड आहे किनारपट्टी भागात तर नारळाच्या बागाच दृष्टीस पडतात. मात्र, प्रतिकूल वातावरण व विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे गेल्या सहा महिन्यात नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे.
सध्या सुरू असलेले विविध धार्मिक सण, गावोगाच्या जत्रा यामुळे बाजारपेठेत नारळाला मोठी मागणी आहे. परंतू नारळाच्या किमंती गगनाला भिडल्या आहेत. सध्या लहानात लहान नारळ 30 ते 35 रू., मध्यम नारळ 40 ते 45 रू. व मोठा नारळ 50 ते 60 रु. दराने विक्री केला जात आहे. सहा महिन्यापूर्वी याच नारळाची किंमत सरासरी 18 ते 25 रू. एवढी होती. म्हणजेचे नारळच्या दरात आज दुप्पटीने वाढ झाली आहे. कोकणात स्वयंपाकसाठी सरास नारळाचा वापर होतो.