शिक्षक हा समाजाला आदर्श असतो तो आदर्श कायम ठेवा ; डी.एड.कॉलेज १९८७/८८ बॅचचे गेटटुगेदर उत्साहात संपन्न !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |


✒️प्रतिनिधी न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग

सिंधुदुर्ग दि . १६

सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी आदरणीय कै.डी.बी.ढोलम संचलित डी.एड.कॉलेज कट्टा सन १९८७/८८ च्या बॅचचा स्नेहमेळावा ‘जिव्हाळा’ कट्टा येथील माडये हॉल मध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.
३५ वर्षानंतरच्या तिसऱ्या स्नेहमेळाव्यात ५० बॅचमेट एकत्र येत विद्यार्थीनी आठवणीनींना उजाळा दिला. धुळे,नाशिक,सांगली,रत्नागिरी,मुंबई आणि सिंधुदुर्ग येथील शिक्षक मित्र -मैत्रिणी एकत्र आले. त्याकाळात प्रतिकुल परिस्थितीत डी.एड.पूर्ण करून कुटुंबासाठी नोकरी मिळवणे तशी फारच अवघड गोष्ट होती.मात्र तत्कालिन विभागिय निवड मंडळाच्या माध्यमातून सर्वजण शिक्षक म्हणुन नोकरीला लागले. तेव्हापासुन आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडवले याचं समाधान प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होतं.
कै.डी.बी.ढोलम सरांना आदरांजली वाहत हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे या गाण्याच्या गायनाने स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली.सुसंस्कारीत शिक्षणाने विद्यार्थ्यांना घडवत सामाजिक बांधिलकीने समाजात कार्यरत रहात समाज घडवण्याचं कार्य याहीपुढे सुरु ठेवा.शिक्षक हा समाजाला आदर्श असतो तो आदर्श कायम ठेवा.असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षकांनी केले.सेवानिवृत्ती नंतरचं आपलं जीवन समाजउद्बोधनासाठी व्यतित करून सदैव कार्यरत रहा असेही मत मांडण्यात आले.
या प्रसंगी केंद्रप्रमुख पदावरून निवृत्त झालेले वासुदेव मराठे,मुख्याध्यापक शिक्षक भालचंद्र जोईल,अरुण होडावडेकर, विद्या पराडकर म्हसकर,वनिता मुंडले सबनीस,अमृत काटे,रमेश सिसाळे,महादेव गुरव आदी ७ जणांचे सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आले.मनोगत व्यक्त करतांना शिक्षकी पेशाचा आम्हाला अभिमान वाटतो.अनेक विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत घडविण्याचं भाग्य आमच्या हातुन घडलं. हा परमेश्वरी संकेत होता. सेवानिवृत्तीनंतरही समाजप्रबोधनाचं काम आम्ही सुरु ठेऊ असे उद्गार काढले.
या स्नेहमेळाव्याला सिंधुदुर्गमधुन सुधीर जोशी,अरुण कदम,राजन हजारे,बबन देवरुखकर,कविता धुरी,प्रदिप सावंत,नितीन जठार,मंगेश मुद्रस,दिलीप पिंगुळकर,चंद्रकांत पांगम,मनिषा पाटकर, स्नेहलता तावडे शैला साटम,रोजमारी फर्नांडिस डिसा,मंजिरी गांगनाईक रांजणकर,शुभांगी त्रिंबककर आजगांवकर,शिवराम सुतार, दयानंद गवस,गीता धुरी,पुष्पलता परुळेकर,स्नेहल सावंत माणगांवकर,प्रतिक्षा सावंत,गीता नाईक,उषा तुळसकर दांडेकर,मिनल जोशी तर कोल्हापूर,सांगली, नाशिक,धुळे मधुन अमृत काटे,बाबुराव गुरव, बाळकृष्ण तुपारे,रमेश पाटील,राजाराम पाटील, शिवाजी पाटील,सुधाकर सोनार,नारायण पाटील,रमेश पाटील,विजय कोळी,महादेव गुरव,एकनाथ वरेकर,नामदेव गुरव,संजय बागुल आदी बॅचमेट शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन दादा जांभवडेकर व सुगंधा माईणकर उर्फ जोशी यांनी केले.