📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️प्रतिनिधी | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
देवगड, दि . १५
मुणगे-कारीवणेवाडी परिसरातील काजूच्या बागेमध्ये ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. त्याची छबी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तेथील ग्रामस्थ निषाद परुळेकर, प्रतिक परुळेकर व सचिन परुळेकर हे या रस्त्याने जात असताना त्यांच्या निदर्शनास हा बछडा आला. ही घटना काल सायंकाळी घडली.
त्यावेळी प्रतिक परुळेकर यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याचे छायाचित्र घेऊन खात्री केली असता तो दुर्मिळ ब्लॅक पँथर असल्याचे समजले. तो साधारण दोन वर्षाचा बछडा असल्याचे प्राणीमित्र यांच्याकडून समजते. मागील चार दिवसापूर्वी हाच बछडा मुणगे-आपईवाडी ग्रामस्थ यांच्या निदर्शनास आला होता, असे निषाद परुळेकर यांनी सांगितले.










