📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
सावंतवाडी दि . १५-
डेगवेतील बीएसएनएल मोबाईल टॉवर येत्या दोन दिवसात ४ जी सेवा सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व सामग्री एक पाठवड्यापासून गावात आणून ठेवली गेली होती. ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे. सर्व शासकीय सेवा ग्रामपंचायत, तलाठी तसेच डेगवे सोसायटी आणि शाळा तसेच व्यावसायिकांना २जी/३जी सेवेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. डेगवे ग्रामस्थांच्यावतीने वेळोवेळी पाठपुरावा, आंदोलन तसेच उपोषण देखील केले गेले होते.
दूरसंचार नियामक प्राधिकरणच्यावतीने सर्व मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांना जानेवारी अखेरपर्यंत मोबाईल इंटरनेट, एसएमएस तसेच फोन करण्यासाठी स्वतंत्र रिचार्ज प्लान जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळेही ग्रामीण भागातील शेतकरी. असंघटित क्षेत्रातील मजूर, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यावसायिक यांना ४ जी सेवा उपलब्ध झाल्यानंतर अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. शिवसेना शिंदे गट उपविभाग प्रमुख आणि डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी ग्रामस्थांना पूर्णवेळ हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला होता.










