रायगडातील सागरी विकास प्रकल्पांना गती; मंत्री नितेश राणे यांचे संबंधितांना निर्देश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील आर.सी.एफ. कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक चॅनेल व संरक्षण बंधारा उभारणी तसेच थळ-नवगाव परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधांची उपलब्धता याबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.
मौजे नवेदार-नवगाव येथील मत्स्य जेट्टी तसेच अलिबाग येथील रेवस-मांडवा प्रवासी जेट्टीच्या प्रलंबित विषयांचा आज मंत्रालयात आढावा घेतला.
बैठकीस आमदार महेंद्र दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. प्रदीप, तसेच आर.सी.एफ. कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.