NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू
Telegram temporary block in india amid NEET 2026 Re-Exam : टेलिग्रामवर सरकारची मोठी कारवाई! re-NEET परीक्षेसाठी तात्पुरती बंदी. कधीपासून पुन्हा सुरू होणार जाणून घ्या
केंद्र सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. लोकप्रिय मेसेजिंग अॅप टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित एका महत्वाच्या परीक्षेमुळे हा पाऊल उचलण्यात आले आहे.
नीट परीक्षेचा नवा टप्पा
२१ जून रोजी पुन्हा नीट (re-NEET) परीक्षा होणार आहे. यापूर्वी अनेक टेलिग्राम ग्रुप्समध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि माहिती फुटल्याचे आरोप समोर आले होते. यामुळे परीक्षेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
कोणते निर्बंध लागू?
सरकारने दोन मुख्य निर्बंध लादले आहेत. पहिला म्हणजे मेसेज एडिटिंग फीचर पूर्णपणे बंद करणे. याशिवाय अॅपच्या काही फीचर्सवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
कायद्याच्या आधारे कारवाई
माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९अ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला. हे निर्बंध २२ जून २०२६ पर्यंत लागू राहतील. मेसेज एडिटिंगची बंदी मात्र ३० जूनपर्यंत कायम राहील.
का घेतला हा निर्णय?
टेलिग्रामच्या खास रचनेमुळे बनावट पुरावे तयार करणे सोपे होते, असे सरकारचे म्हणणे आहे. परीक्षेनंतर काही लोक याचा गैरफायदा घेत असल्याचे आढळले. सरकार विद्यार्थ्यांना निष्पक्ष परीक्षा देण्याचा प्रयत्न करत आहे.












