सिंधुदुर्ग प्रतिनिधी,
सिंधूदुर्ग कणकवली पर्यटन महोत्सवात नारायण राणे हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले. यावेळी नारायण राणे यांनी वैभव नाईक यांचा चांगलाच समाचार घेतला.
चिपी विमानतळाला टाळ मारणार..कधी जातोस साग रे मला…टाळ मारूनच दाखव…नाही तुझ्या घराला टाळ मारलं ना तर नारायण राणे नाव सांगणार नाही. असे खडेबोल सुनावात माजी आमदार वैभ नाईक यांच्या वर संताप व्यक्त केला आहे, नारायण राणे हे म्हणाले की, काही लोक वृत्तपत्रातून आम्हाला धमक्या देतायत. हे दहा वर्षे आमदार होते सभागृहात कधी बोललेत का?
नारायण राणे पुढे म्हणाले की, या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज मी आणलं. चिपी विमानतळाला विरोध करणारे लोक हे शिवसेनेचे (उबाठा गट) असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. मी कुठेही असलो तरीही सिंधुदुर्गातील वृत्तपत्रातील बातम्या मी बारकाईने वाचतो. चिपी विमानतळाला कोणी विरोध केला होता, आम्हाला विमानतळाला जागा द्यायची नाही. इथे आमची शेती होते, आमची उपासमारी होईल.थेट त्यांनी चिपी विमानतळाला टाळं मारूनच दाखव म्हटले. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आता यावर काय उत्तर देतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. विमानतळाला उबाठा गटाचा विरोध असल्याचे सांगितले जाते. मात्र, यावेळी नारायण राणे यांनी पुढे येऊन विमानतळासाठी जागा असो किंवा इतर काही गोष्टी त्यांनी केला. राणे यांनी स्पष्ट केले की, काही टेक्निकल गोष्टींमुळे सध्या प्रवासी वाहतूक बंद आहे.










