






सकल हिंदू समाज, नेरळ मंडळ आयोजित विराट हिंदू संमेलनाला मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून हिंदू बांधवांना संबोधित करण्याची संधी लाभली.
नेरळसारख्या ठिकाणी हिंदू एकतेची ताकद अधिक भक्कम व्हावी, यासाठी हिंदू समाजाने संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू म्हणून आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी शासन म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास यावेळी मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला.
आजच्या काळात हिंदू समाजाने जागरूक, संघटित आणि सजग राहणे ही काळाची गरज आहे. हिंदूंवर अन्याय अथवा अत्याचार झाल्यास संपूर्ण समाजाने एकजुटीने आणि ताकदीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री नितेश राणेंनी केले.












