
देवगड-जामसांडे नगरपंचायत हद्दीत मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नमो गार्डन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी शहरातील स्वच्छता व्यवस्थेसाठी सक्शन व्हॅन उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नमो गार्डनसारखे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. सक्शन व्हॅन सुविधेमुळे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊन स्वच्छतेला मोठी मदत होणार आहे.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, सभापती बुवा तारी, तनवी चांदोस्कर, गटनेते शरद ठुकरुल, संदीप साटम, बाळ खडपे, मुख्याधिकारी पाटील, तालुका सचिव योगेश चांदोसकर, नगरसेवक योगेश पाटकर, दया पाटील, नगर अभियंता विवेक खोत यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.









