महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मालवणात मा. आमदार निलेश राणेंच्या हस्ते भव्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र माझा!
आज १ मे… महाराष्ट्र राज्य स्थापना दिन आणि कामगार दिनानिमित्त संपूर्ण राज्यभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथेही देशभक्तीचा आणि अभिमानाचा उत्सव साजरा करण्यात आला.


मालवण तहसीलदार कार्यालयात आज सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मा. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून त्याला मानवंदना देण्यात आली.

या प्रसंगी तहसीलदार श्री. गणेश लव्हे, निवासी नायब तहसिलदार श्री. विनायक जांभेकर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून देशभक्तीची भावना व्यक्त केली, तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त अशा कार्यक्रमांमधून राज्याच्या समृद्ध परंपरेची आणि कष्टकरी वर्गाच्या योगदानाची आठवण पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे

गर्जा महाराष्ट्र माझा! जय हिंद!