प्रमोद जठार यांचा विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल; पालकमंत्री नितेश राणेंकडून अभिनंदन आणि शुभेच्छा

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला आहे.

विधानभवन येथे हा अर्ज दाखल करताना राजकीय वातावरण उत्साहपूर्ण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी श्री. प्रमोद जठार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या महत्त्वाच्या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे तसेच आमदार प्रसाद लाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भाजपच्या या उमेदवारीमुळे विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील काही दिवसांत प्रचाराची रंगत वाढण्याची शक्यता आहे.