भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा
साईनाथ गांवकर / कोकणशाही
नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी (२०२६) पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले.
भाजपचे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे आहेत:
- सुनील विनायक कर्जतकर
- श्रीमती माधवी नाईक
- संजय नत्थूजी भेंडे
- विवेक बिपिनदादा कोल्हे
- प्रमोद शांताराम जठार
या यादीमध्ये पक्षाने विविध भागांतील अनुभवी नेत्यांना संधी दिली असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव निश्चित करण्यात आले आहेत. या निवडीद्वारे भाजपने राज्यातील राजकीय समीकरणे आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.












