माजी मुख्यमंत्री खासदार श्री.नारायण राणे साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चातर्फे देवगड़ जामसंडे शहरातील ७५ कुटुंबाना शिधा वाटप

देवगड : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री नारायण राव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिधा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे शुक्रवार, दि. १0 एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या उपक्रमात गरजू नागरिकांना शिधा वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने करण्यात आले असून, तालुकाध्यक्ष श्री.राजा भुजबळ व सरचिटणीस श्री.योगेश चांदोसकर व श्री. दयानंद पाटील (अध्यक्ष, देवगड-जामसंडे शहर) यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.तसेच यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत.

माजी मुख्यमंत्री Narayan Rane यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या सामाजिक उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मदत मिळणार असून, समाजात सकारात्मक संदेश जाणार आहे.
संपर्क दयानंद पाटील ८६०५१६८०८०
संजय तारकर-+91 724-9173250