अंधार सारा दूर झाला.. प्रकाश हा दरवळला.. जणू दीपावलीचा सण आला….

सावंतवाडीकर नागरिकांमध्ये जोरदार औत्सुक्य! भाजपा संपर्क कार्यालय आकर्षक रोषणाईने सप्तरंगात न्हाऊन निघाले!

भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन उद्या सहा एप्रिल रोजी पूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालय जोरदार रोषणाईने झळाळून निघाले आहे.

भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांच्या संकल्पनेप्रमाणे भाजपा युवा नेते श्री विशालजी परब आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून भाजपा स्थापना दिनानिमित्त अनेक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांसाठी संपर्क कार्यालय सज्ज झाले असून भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी संपर्क कार्यालय जोरदार रोषणाईने उजळून टाकले आहे. सावंतवाडीकर नागरिकांमध्ये संपर्क कार्यालयावरील रोषणाई हा आकर्षणाचा विषय ठरला आहे. एकूणच भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असलेला जोरदार उत्साह आणि भाजपाचा स्थापना दिन आजच्या स्थितीला राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे एवढे निश्चित.