रविंद्र चव्हाणांनी इन्सुली जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्या कार्यालयाला दिली भेट

सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणुकीत इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघ निवडून आलेले इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या इन्सुली जनसंपर्क कार्यालयाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली.

यावेळी श्री.चव्हाण यांचे राऊळ समर्थकांनी स्वागत केले. गोवा राज्यात शिमगोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अपक्ष नितीन राऊळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.

यावेळी त्यांच्या समवेत युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सभापती आनंद नेवगी, मनोज नाईक, अजय सावंत,जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, रुपेश पावसकर, सुजाता पडवळ,राजन चिके,कास सरपंच प्रवीण पंडित, सागर राणे, पप्पू मुळीक, सुहास ठाकूर, रघुनाथ नाईक, प्रथमेश सावंत,सुदीन गावडे, पिंट्या नाईक,नंदू नेमण, सुजाता ठाकूर, समीर गावडे, गुरुदास गवंडे,निबाज खान, राम धुरी,वृषाल पोपकर, किशोर जाधव, सतिश मोरजकर,बाबु पंडित, अशोक शेटये, शुभांगी निगुडकर, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.