
मालवण : तारकर्ली येथील जयवंत सावंत यांची शिवसेनेच्या मालवण उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील उपतालुकाप्रमुख मालवण पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, अशी अपेक्षा या नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. कोकणशाही मालवण