मुंबई पोलीस दलात शिस्तभंग आणि गंभीर प्रकरणांबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या सहा वर्षांत विविध कारणांमुळे एकूण 58 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी 53 अधिकाऱ्यांना चौकशीअंती पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे.
या मागिल नेमकं कारण काय?
पोलीस दलातील अधिकारी कधी कधी आर्थिक गैरव्यवहार, शिस्तभंग, अधिकारांचा गैरवापर किंवा अन्य गंभीर आरोपांमध्ये अडकतात. अशा प्रकरणांमध्ये दोष गंभीर स्वरूपाचा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाते. सन 2020 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत मुंबई पोलीस दलातील 58 अधिकारी गंभीर प्रकरणांत सापडले होते. त्यामुळे त्यांना सेवेतून तात्पुरते दूर करण्यात आले.
निलंबीतांमध्ये कोणकोणत्या पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे?
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये विविध पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईत तब्बल 31 पोलीस उपनिरीक्षक, 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 13 पोलीस निरीक्षकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून वरिष्ठ ते मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत शिस्तभंगाच्या कारवाईची व्याप्ती असल्याचे स्पष्ट होते. हे आकडे फक्त मुंबईतील असून पूर्ण महाराष्ट्रभरातील आकडेवारी आश्चर्यचकित करणारी असू शकते. निम्म्याहुन अधिक अधिकऱ्यांना दिलासा
दरम्यान, निलंबनानंतर विभागीय चौकशी आणि तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बहुतांश अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एकूण 58 पैकी 53 अधिकाऱ्यांना दोष सिद्ध न झाल्याने किंवा प्रकरणांची गंभीरता कमी असल्याचे आढळल्याने पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. मात्र, उर्वरित अधिकाऱ्यांबाबत चौकशी अद्याप सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
446 कोटी अडकून, 2 लाख लोकांचा जीव टांगणीला.. पुणे ‘म्हाडा’ची EC कडे धाव; ‘त्या’ घरांचं होणार काय?
सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस दलावर मग…
मुंबईसारख्या संवेदनशील महानगरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस दलावर असते. त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही चूक झाल्यास त्यावर तात्काळ आणि कडक कारवाई केली जाते. ही आकडेवारी पाहता, पोलीस प्रशासन शिस्त राखण्यासाठी सजग असल्याचे दिसून येते, तर दुसरीकडे चौकशी पूर्ण झाल्यानंतर निर्दोष अधिकाऱ्यांना पुन्हा संधी देण्याची भूमिका देखील घेतली जात असल्याचे स्पष्ट होते. कोकणशाही मुंबई









