सिंधदुर्गात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी : ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर झाली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटींची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे.
यात आमदार निलेश राणे यांनी जास्तीत जास्त आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्या नंतर कुडाळ तालुक्यातील 8891 शेतकरी तर मालवण तालुक्यात 3122 अश्या कुडाळ मतदारसंघात एकूण 12013 शेतकऱ्यांना मिळून एकूण 2 कोटी 79 लक्ष 60 हजार 755 रुपये एवढी नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण नुकसानभरपाईच्या 50% पेक्षा जास्त नुकसानभरपाई कुडाळ मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळाली असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे. कोकणशाही सावंतवाडी