आज सायंकाळी ६ वा. होत आहे पत्रकार परिषद
साईनाथ गांवकर / सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले. भाजपचे युवा नेते विशाल परब यांची पत्रकार परिषद मतदानाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वा. सावंतवाडी येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेतून विशाल परब नेमकं काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मागील काही दिवस प्रचारादरम्यान विशाल परब यांच्यासहित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धा सावंत भोसले याना देखील विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला सामोरे जावे लागलेले. त्यामुळे आता विशाल परब यांच्या होणार असलेल्या पत्रकार परिषदेला तितकेच महत्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक आरोप अन बदनामी होत असताना एरव्ही पत्रकारांच्या प्रश्नाला नो कमेंट्स असे उत्तर देणारे विशाल परब आज तरी विरोधकांवर तुटून पडणार का? भाजपा विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवत असल्याने सावंतवाडीकरांना अजून काही गुड न्यूज विशाल परब देणार आहेत का? या सर्व प्रश्नांकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सावंतवाडीतील शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे ही निवडणूक तितकीच चर्चेची राहिली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत राजघराण्यातून सौ. श्रद्धा सावंत भोसले या भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. भाजपाचे पॅनल विकासाचा मुद्दा घेऊन या रिंगणात असून भाजपच्या विरोधकांकडून केवळ आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विशाल परब आजच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलतायत याकडे सावंतवाडी करांच्या नजरा लागून राहिल्यात.



