राजन साळवींनी सूर बदलला !

ठाकरे गटाचे उपनेते राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. या सगळ्या अफवा आहेत असेही म्हटलं होतं. त्यानंतर झालेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी, राजन साळवींवर अन्याय झाल्याची भूमिका मांडली आहे. असे सांगितल्याने राजन साळवी यांनी आपला सूर बदलला आहे.

आपण पदाधिकाऱ्यांजवळ चर्चा करुन योग्य निर्णय योग्य वेळी घेऊ अशी प्रतिक्रिया देत पक्षबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.