मंत्री नितेश राणे यांचा मागणीला मोठे यश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय समोर आला आहे. मंत्री नितेश राणेंच्या मागणीनुसार शासनाकडून एक निर्णय जारी करण्यात आला आहे.
मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे वीज सवलत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही वीज सवलत मिळणार आहे. मच्छीमार, मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यवसायिक, मस्त्यकास्तकार यांना ही सवलत लागू होणार आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. मस्त्य व्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्याचा सरकारचा निर्णय कौतुकास्पद असून या निर्णयाचे मच्छिमार बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.










