एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयात अँटी रॅगिंग जागृती कार्यक्रम संपन्न


कुडाळ ; जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग मा.श्री. अवधूत देशिंगकर यांच्या उपस्थितीत अँटी रॅगिंग बद्दल जन जागृती हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये यावेळी न्यायाधीशांनी रॅगिंग किती हानिकारक आहे. तसेच त्याचे होणारे परिणाम संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना देऊन रॅगिंग विषयाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यामुळे विद्यार्थ्यांनच्या मानसिकतेवर आणि समाजावर होणारे परिणामाची गंभीरता याची जाणीव करून दिली. रॅगिंगचा त्रास झाला तर तक्रार कोणाकडे करायची तसेच त्या रॅगिंग संदर्भात चौकशी करून त्यावर कशाप्रकारे कारवाई केली जाते.या संदर्भात देखील त्यांनी सांगितले. ही केलेली कारवाई जर सत्य असेल तर कशाप्रकारे दंडात्मक कारवाई केली जाते.याचे देखील गांभीर्य त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जर एखाद्याने रॅगिंग केले असेल.तर त्याला तत्काळ कॉलेजमधून बाहेर काढले जाऊ शकते. तसेच कोणत्याही कॉलेजमध्ये पाच वर्षाकरिता ऍडमिशन मिळणार नाही. त्याचप्रमाणे दोन वर्षाची न्यायालयीन कोठडी ही शिक्षा,दहा हजार रुपये दंड घेण्याची तरतूद कायद्यात आहे.आणि कोणत्याही शासकीय सेवेत कधीही नोकरी मिळताना अडचणी येतील अशा प्रकारे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच एखाद्या विद्यार्थ्यास भारतीय नागरि दंड संहिता मार्फत देखील योग्य त्या पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे कोर्टात देखील दाद मागता येऊ शकते. रॅगिंग हे जिथे शिक्षण घेतले जाते त्या ठिकाणी सर्वात जास्त केले जाते कुठेही रॅगिंग झाले तरी तुम्हाला न्याय मागणे सोपे आहे.आता कायदा तुमच्या बाजूने आहे. दुर्बलासाठी हा कायदा ठामपणे उभा आहे असे ते म्हणाले. त्याचबरोबर जाता जाता त्यांनी विद्यार्थ्यांना नियमाचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणारे रोड अपघात व त्याचे परिणाम यांची देखील माहिती दिली. आयुष्य खूप सुंदर आहे.ते चांगल्या पद्धतीने जगा आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मा. न्यायाधिशांनी महाविद्यालयाचा परिसर व विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक केले.

या प्रसंगी बोलताना एम.आय.टी.एम चे प्राचार्य डॉ. एस व्हि. ढणाल यांनी न्यायाधीश मा.श्री.अवधूत देशिंगकर यांचे सर्वप्रथम आभार मानले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या माहितीचे कसे आचरणात आणता येईल हे सांगितले.

यावेळी ॲव्होकेट श्वेता तेंडुलकर ,लोक अभिरक्षक सिंधुदुर्ग लिपिक श्वेता सावंत उपस्थित होते. तसेच कॉलेजचे डिप्लोमा प्राचार्य श्री.विशाल कुशे, उपप्राचार्य सौ.पूनम कदम, प्रशासकीय अधिकारी श्री.राकेश पाल तसेच सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अश्विता जाधव यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोष पाल ,उपाध्यक्ष श्री. विनोद कदम, सेक्रेटरी सौ.नेहा पाल, खजिनदार सौ.वृशाली कदम तसेच संस्थेचे विश्वस्त श्री. केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या. कोकणशाही – कुडाळ