एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महावि‌द्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा ; जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची उपस्थिती


सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग माननिय श्री.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.भैय्याजी येरमे व एम.आय.टी.एम संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती अधिकारी श्री.अमित तडवी, श्री. सुरज देबाजे, श्री. नामदेव सावंत तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. रविंद्र पत्की व अप्रेंटिसशिप ॲडव्हायझर सिंधुदुर्गचे श्री.उमेश कुलकर्णी तसेच संस्थेचे विश्वस्त श्री. विनोद कदम, सौ.वृषाली कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अशोक सावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे प्राचार्य डॉ. एस.व्हि.ढणाल, डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे, उपप्रचार्य सौ.पूनम कदम आदी उपस्थित होते.तसेच संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी माननिय श्री. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास यावर मार्गदर्शन केले. कौशल्य म्हणजे काय व आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात. त्यांना कौशल्य म्हणजे काय हे माहीतच नसते यासाठी या लोकांच्या जीवनात कौशल्य ची जाणीव करून देणे आवश्यक आहे. आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.आपले श्रम किती कमी होतील, कोणतेही काम सहजपणे करणे किती शक्य होईल, यासाठी जे प्राविण्य मिळवून लोकांना चांगली सेवा देता येईल याचा आपण विचार करायला हवा. त्यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही नोकरी करून नोकर होण्यापेक्षा कौशल्य विकासच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे रोजगार उभारा आणि उद्योजक बना.त्याचबरोबर त्यांनी एम.आय.टी.एम. कॉलेजचे वातावरण हे विद्यार्थ्यांना उद्योजक घडविण्यासाठी खूप सुयोग्य आहे. आणि विद्यार्थ्यांनी विविध उद्योजक होऊन भविष्यात आपल्या कॉलेजचे नाव मोठं करा असे ते म्हणाले. जिल्ह्यातील शेतकरी तसेच तुमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फायदा करा. असे ही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
त्यावेळी या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री .अशोक पत्की देखील उपस्थित होते.त्यांनी आपल्या जिल्हा उद्योजक केंद्राबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ते म्हणाले की रोजगार आणि स्वयंरोजगार ह्या दोन रोजगाराच्या बाजू आहेत. रोजगारामध्ये तुम्ही स्वतः रोजगार शोधणार आहात आणि स्वयंरोजगार म्हणजे तुम्ही स्वतः रोजगार देणार आहात यासाठी जिल्हा उद्योग केंद्र मार्फत तुम्हाला ज्या योजना हव्या आहेत. त्याचा लाभ घेता येईल, त्यांनी वेगवेगळ्या योजना विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी नारळ, कोकम, काजू, आंबा, सुपारी यापासून सर्वात जास्त उत्पन्न मिळवून वेगवेगळी उत्पादने घेता येतात. याचा तुम्ही विचार करा शेतीला तांत्रिकतेची जोड देणं खूप गरजेचे आहे. ते तुम्ही करा असे जर करत असाल तर आमचे केंद्र नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे मदत देखील करतील कोणतेही काम लहान नाही यातूनच तुम्ही मोठे व्हाल तुमची दिशा आजच निश्चित करा असे ते म्हणाले.
तर जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे श्री.सुरज देबाजे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास केंद्राच्या विविध योजनांची माहिती सांगितली. मुख्यमंत्री युवा योजना, दीनदयाळ उपाध्याय योजना, मार्फत रोजगार मिळावा.ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका,बेरोजगार सेवा अभ्यासिका, सहकारी तत्त्वावर शासनमान्यता देणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.तर त्याचबरोबर संस्थेचे विश्वस्त श्री. विनोद कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की खऱ्या अर्थाने जर विकासाच्या वेगाला साथ द्यायची असेल तर पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून ती जर जोड दिली गेली, तर औद्योगिक विकास करता येईल.बेरोजगाराची संख्या कमी करता येईल.आपल्याकडून तयार होऊन जाणाऱ्या इंजिनियर हा एक सक्षम इंजिनियर असेल यासाठी तुम्ही कौशल्य विकासाच्या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. युवा बेरोजगारीची संख्या कमी करून रोजगाची विचार सरणी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले
युवा विद्यार्थ्यांमार्फत एम.आय.टी.एम.कॉलेजच्या ऐश्वर्या पालव, दर्पण गावडे या विद्यार्थ्यांनी युवा कौशल्य कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.तसेच एम. आय.टी. एम. कॉलेजचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. व्हि. ढणाल विद्यार्थ्यांना जागतिक युवा दिनाचे महत्त्व सांगताना म्हणाले,आताचे युग हे डिजिटल युग आहे. त्याचा वापर करा आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योजक होण्यासाठी आज ही संधी चालून आली आहे. याचा तुम्ही फायदा करून घ्या. त्यांनी लोकसंख्या लाभांश व स्किलिंग इंडिया या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी श्री. अमित तडवी यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त श्री.संतोष पाल, सौ.नेहा पाल व संचालक श्री.केतन कदम यांनी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.