सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी. एम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 9 वा पदवीदान सोहळा संपन्न झाला. 70 हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या कॉलेजमधून मेकॅनिकल, सिक्षित्र, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेली कम्युनिकेशन या शाखंमधून विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्याथ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच सुकळवाड येथील कॉलेजमध्ये झाला. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवराज लखन राजे खेम सावंत भोसले श्री. पंचम खेमराज कॉलेजचे विश्वस्त व युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सिनेट मेंबर यांच्या हस्ते पदवीदान सोहळा संपन्न करण्यात झाला. त्यांनी आपल्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक कार्याबद्दल थोडक्यात सांगितले, तसेच तुम्ही नेहमी शिक्त रहा कुठेही थांबू नका. शिक्षणाबरोबर अनुभव देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. वाईट चांगलं ओळखणं गरजेचं आहे. AI ला तुम्ही तुमचं करिअर म्हणून बघा. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी अॅडव्हान्स होत चालली आहे. अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करा.
तर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विनोद कदम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत म्हणाले की, चांगल्या प्रतीचे इंजिनियर या कॉलेजने घडवले या प्रवाहात सामील होऊन शैक्षणिक क्षेत्राची प्रगती होणे गरजेचे आहे. तरच आपला देश पुढे जाईल देशाचे भविष्य म्हणजे तुम्ही आहात भविष्य उज्वल आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणात प्रगती करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करून हा जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीपथावर येणे म्हणजे खरे यश आहे. असे ते म्हणाले.
तर संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष पाल यांनी विद्याथ्यर्थ्यांशी संवाद साधत म्हणाले की, आयुष्यात आता तुम्ही पदवीधर होऊन बाहेर पडणार तर तुमच्यामध्ये सहनशक्तीची पातळी उंच असली पाहिजे. आयुष्यात कोणतेही काम करताना त्या कामाचे महत्त्व लक्षात घ्या. त्याचे श्रेय मिळाले नाही तर अपयशी होऊ नका नव्याने उभे रहा त्यावेळी त्यांनी एम. आय. टी. एम. कॉलेजच्या सुरुवातीच्या काळाविषयी सागितले पूर्ण प्रदेश जंगलमय होता. त्यावेळी आम्ही है कॉलेज उभारले आज ते सर्वत्र दिसत आहे. आज आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची पीएचडी घेतलेला आहे. तसे कार्य तुम्ही करा आणि स्वतः बरोबर कॉलेजचे नाव देखील यशस्वी पथावर न्या असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले.
त्याचप्रमाणे कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्हि.ढणाल यांनी सर्व प्रथम विद्याथ्यर्थ्यांचे अभिनंदन केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी इंजीनियरिंग हे योग्य पर्याय तुम्ही तुमच्या आयुष्यात निवडले आहे त्याचा योग्य पद्धतीने फायदा करा. नक्कीच यामुळे तुमचे भविष्य उज्वल होईल असे म्हणाले.
यावेळी या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक सावंत, संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष पाल, उपाध्यक्ष श्री. विनोद कदम, खजिनदार सौ. वृषाली कदम, प्राचार्य डॉ. एस.व्ही.ढणाल, परीक्षा विभाग प्रमुख श्री. विशाल कुरी, उपप्राचार्य सौ. पूनम कदम, सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आणि कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.सौ. जानकी पावसकर व सूत्रसंचालन प्रा. सौ. हिनाली कोरगावकर यांनी काम पाहिले.