मंत्रालयात राणे बंधूंची भेट – मालवण किनारपट्टी भागातील समस्यांवर झाली चर्चा

आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दालनात भेट घेतली.

या भेटीदरम्यान मालवण किनारपट्टी भागातील नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा झाली. यासाठी उपाययोजना राबवण्याची आणि विकास कामांना मंजुरी देण्याची मागणी केली. सर्व कामांना प्राधान्य देऊन मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.