देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांना मिळाली बढती
सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून हाती घेणार अतिरिक्त कार्यभार
देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांना सिंधुदुर्ग जिल्हा खनीकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जारी केला आहे. आर. जे. पवार यांचे प्रशासनात शिस्तीचे अधिकारी म्हणून नावलौकिक आहे. आपल्या कार्यकर्तूत्वाने प्रशासनात चांगली छाप पाडणाऱ्या काही अधिकाऱ्यांमध्ये आर. जे. पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.