एम्.आय.टी.एम्. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमात मोठया प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते यावेळी जयवंती बाबू फाउंडेशनचे विश्वस्त मा. श्री. विनोदजी कदम साहेब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना संस्थेचे विश्वस्त मा. श्री. विनोदजी साहेब यांनी डॉ. बाबासाहेबांविषयी सामाजीक दृष्टीकोन, समानता आणि शिक्षणाबाबत असलेली त्यांची तळमळ याविषयीचे आपले विचार मांडले व सध्याच्या तरुण पिढीने समाजासाठी योगदान दिले पाहिजे असे सांगितले.

यासमयी संस्थेचे विश्वस्त श्री. विनोदजी कदम साहेब, सौ. वृषाली कदम मॅडम (विश्वस्त), प्राचार्य डॉ. शैलेन्द्र धनाल, डिप्लोमा महाविद्यालयाचे मा. प्राचार्य श्री. विशाल कुशे, जनसंपर्क अधिकारी, मा. श्री. विलास पालव, सर्व विभाग पंमुख, प्राध्यापक व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.