कुडाळ :
तालुक्यात पावशी केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा आज सकाळी अपघात झाला. यामध्ये काही शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.कुडाळ बामणादेवी कुडाळ शालेय फेरीची एसटी बस आणि इको कार यांच्यात आज सकाळी हा आघात झाला. यामध्ये इको कार मधील शालेय विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. अरुंद रस्त्यावर अपघात झाल्याने शाळकरी मुले अडकली होती, तर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.










