मुंबईत जाधव गुरुजींच्या स्मृती जागणार ; येत्या ३० मार्चला अभिवादन सभेचे आयोजन

महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केलेले विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आदर्श शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भिवा कृष्णा जाधव अर्थात जाधव गुरुजी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.जाधव गुरुजींनी देहदानाचा संकल्प करून आपल्यातील शिक्षण सेवेच्या व्रताला अधिक प्रगल्भ केले. त्यांच्या कुटुंबीयांनी सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांची देहदान प्रक्रिया पूर्ण केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेले गुरुजी हे विद्यार्थी हित आणि शिक्षण कार्यासाठी नेहमी आग्रही राहिले. समाजमन आणि समाजभान जपत एक शिक्षक म्हणून त्यांनी अनेक संस्कारक्षम विद्यार्थी घडविलेत. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, प्रबोधनपर कार्यक्रम आणि विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी सेवा केली.शिक्षण यज्ञात आपले अवघे जीवन मरण समर्पित करणाऱ्या जाधव गुरुजींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईत येत्या ३० मार्च २०२५ रोजी अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. यात विद्यार्थी, सहकारी, नातेवाईक, मित्र परिवाराने सहभागी व्हावे.

तसेच अधिक माहितीसाठी वरिष्ठ पत्रकार मिलिंद तांबे यांच्याशी

(+91 98695 02340 )संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.