ब्युरो न्यूज कोकणशाही
महिला सशक्तीकरणाला गती देण्यासाठी मोदी सरकारने एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. “स्वर्णिमा योजना”अंतर्गत मागासवर्गीय महिलांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जासाठी कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक करण्याची गरज नाही. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जात आहे.ही योजना मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांना पूरक ठरेल. महिला उद्योजकांसाठी ही मोठी संधी असून त्यांना आर्थिक मदती सह व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.










