आंबोली,
चौकुळ – इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा थरार चौकुळ जंगलात घडला. त्या हल्ल्याला प्रतिकार करीत महिला वन अधिकारी प्रमिला शिंदे यांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शिकार केलेला मृत ससा, काडतुसे आणि बंदुका, तीन दुचाकी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई काल रात्री चौकुळ येथील जंगलात करण्यात आली.दशरथ बाबुराव राऊळ (रा. माडखोल), प्रशांत सदानंद कुबल (रा. कुडाळ), अमोल नामदेव गावडे (रा. खासकीलवाडी- चौकुळ), सखाराम चंद्रकांत राऊळ (रा. माडखोल) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वनजीव संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे वनअधिकारी शिंदे यांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोली जंगलात काही शिकारी फिरत असल्याची माहिती शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यरात्री इसापुर परिससरात हे चौघे संशयास्पदरीत्या दिसून आले. यावेळी त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हातात असलेली बंदूक घेवून गोळीबार करुन त्या ठिकाणावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे आढळून आलेल्या वाह तपासणी केली असता एक शिकार केलेला मृत ससा, पाघेण्यात आले आहे. त्यांच्याकडे आढळून आलेल्या वाहनाची तपासणी केली असता एक शिकार केलेला मृत ससा, पाचजीवंत काडतूसे, दोन बॅटऱ्या, दोन मोबाईल, एक हेडफोन आणि तीन दुचाकी आदी साहित्य आढळून आले आहे. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून शासकीय कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .मालवण बसस्थानकाचा स्लॅब कोसळून महिला प्रवासी गंभीर जखमी…










