मालवण बसस्थानकात इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी…

मालवण बसस्थानकाची नवीन इमारत कार्यान्वित करण्यासाठी देण्यात आलेली डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली असून बुधवारी सकाळी येथील जुन्या बसस्थानक इमारतीत आज प्रवाशाच्या डोक्यावर स्लॅब कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेमुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून नवीन बसस्थानक इमारत सुरु करण्यास मुहूर्त कधी मिळणार ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.मालवण बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे काम मागील सात वर्षांपासून सुरु असून डिसेंबर अखेरीस हे काम पूर्ण होऊन जानेवारीमध्ये जुनी इमारत पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मार्च संपत आला तरी नवीन इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी अद्यापही जुन्या इमारती मधूनच वाहतूक सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी याठिकाणी स्लॅब कोसळून प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती. आज पुन्हा एकदा या दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली. याठिकाणी सकाळी गाडीची वाट बघत बसलेल्या महिलेच्या डोकी वर स्लॅबचा तुकडा पडल्याने ही दुर्घटना घडली. सदर जुनी इमारत जिर्ण झाली असन ती पाडण्याची कारवाई अद्याप करण्यात येत नसल्याने वारंवार दुर्घटना घडत असल्याचे समोर येत आहे.नवीन बस स्थानक इमारत बांधून पूर्ण झाली असून काही किरकोळ कामे शिल्लक राहिल्याने सदरची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे प्रवाशांना जुन्यात बसस्थानक इमारतीत थांबून रहावे लागत आहे. आणि दुर्घटनेला बळी पडावे लागत आहे. यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.चौकूळ येथील जंगलात शिकार करणाऱ्या चार आरोपीना पडकडले. रेंजर प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई