ओरोस येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात होणार जनता दरबारफोटोसिंधुदुर्गमत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ते जनतेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत. प्रत्येकाला भेटणार आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार आहेत. तरी या जनता दरबारात जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.










