रत्नागिरी
मागील काही वर्षांपासून उद्योगापासून दूरराहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः रत्नागिरी तालुक्यामध्ये नवनवे प्रकल्प आणण्यात राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार यशस्वी झाले आहेत. या उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे भूसंपादनही सुरू असून, यातील मँगोपार्कसाठी निवेंडी, तर रीळ-डंडी एमआयडीसीसाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, यासाठी आवश्यक चारशे कोटींच्या निधीची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे.अडीच वर्षांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्रीपद मिळाल्यानंतर रत्नागिरीमध्ये मँगोपार्क, तर दापोलीतील हर्णे येथे फिशपार्क उभारण्याची घोषणा उदय सामंत यांनी केली होती. त्यादृष्टीने रत्नागिरी मतदारसंघात निवेंडी येथे मँगोपार्क उभारण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत. यासाठी १०४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार असून, त्याची मोजणीही पूर्ण झाली आहे. यासाठी १४४.९९ कोटी रुपयांची मागणी प्रशासनाने• १०४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन मोजणीही पूर्ण• रीळ – उंडी येथे ही प्रकल्पांमुळे सुमारे ४० प्रकल्पासाठी २०५. हजारांहून अधिहेक्टर जागेचे भूसंपादन रोजगार उपलब्ध होणार आहे.
काय असेल मँगोपार्क मध्ये
या मँगोपार्कमध्ये आंब्यावर आधारित पूरक प्रक्रिया उद्योग उभारणार आहे. आंबा कॅनिंग, ग्रिडिंग असे प्रकल्प यात होणार आहेत. कोकणातील आंब्यांच्या वैशिष्ट्याची माहिती देणार आहेत. आंबा प्रक्रियावर आधारित उद्योगांना एकत्रित आणण्यात येणार आहे.एमआयडीसीकडे केली आहे. या जागेचे अंतिम नोटीफिकेशन ही निघाले आहे. याचप्रमाणे रीळ- उंडी येथेही प्रकल्प उभारला जाणार असून, याठिकाणी २०५ हेक्टर जागेचे भूसंपादन होणार आहे. या ठिकाणीही मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यासाठी २५४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.या प्रकल्पांमुळे जवळपास ४० हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. पुढील पाच वर्षांत त्यामुळे रत्नागिरीचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.मागील पाच वर्षांत मंत्रिपदाच्या कारकिर्दीत ना. सामंत यांनी उच्च तंत्र खाते असताना रत्नागिरीला एज्युकेशन हब बनवण्यासाठी विविध शासकीय महाविद्यालये सुरू केली. त्यामुळे बाहेरील हजारो विद्यार्थी सध्या रत्नागिरीत शिक्षण घेत असून, याचाही फायदा रत्नागिरीला होता दिसत आहे.









