पणदूर – अणाव-सुकळवाड मार्गावरील अणाव-रताळे या भागात अचानक रस्त्यावर आलेल्या गव्यांच्या कळपाचा थरार मंगळवारी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास अणाव मधील युवकांनी अनुभवला. जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या गव्यांच्या कळपाने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक मारली. यामध्ये लौकिक सागर राणे (२०, रा. अणाव) हा युवक गंभीर जखमी झाला, तर गणेश सुंदर आंगणे (१६) आणि ऋषी बाबाजी सावंत (१८, दोघेही रा. अणाव) हे युवक किरकोळ जखमी झाले.बोलावून जाब विचारला. कुडाळ तालुक्यातील अणाव गावात मंगळवारी सायंकाळी पणदूर – अणाव- सुकळवाड मार्गावर अणाव- रताळे भागात अचानक रस्त्यावर आलेल्या गव्यांच्या कळपाने दुचाकींना धडक मारली. यात वरील तिघे दुचाकीस्वार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यातया घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकाराने संतप्त ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना घटनास्थळी आले.धडक दिल्यानंतर गव्याने दुचाकीची पेट्रोल टाकीचा चुराडा केला. तीनही स्वार धडकेनंतर बाजूला फेकले गेल्याने बचावले. यात लौकिक सागर राणे याच्या छातीच्या बरगड्या, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.










