पोईप एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरणचे वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक श्री दत्ता सामंत, प्रयोगशाळा देणगीदार आर डी परब, उद्योजक सुरेश नेरुरकर, पोईप संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, पोईप सरपंच श्रीधर नाईक, सनदी लेखापाल सुहास पालव, संस्था सचिव विलास माधव, संस्था संचालक महेंद्र पालव,महेश पालव, सत्यवान पालव,कमलेश प्रभू, विश्वनाथ पालव, नामदेव पुजारे,माजी नगरसेवक दिपक पाटकर,संजय माधव, अरूण भोगले, पोईप पोलिस पाटील अविनाश जाधव, बाबुराव चिरमुले, अरूण मेस्त्री, डॉ हर्षल परब, डॉ सुनिल परब, डॉ अस्मिता परब, मुख्याध्यापक विकास कुंभार,हेदुळ सरपंच प्रतिक्षा पांचाळ,वायगवडे सरपंच विशाखा सकपाळ,व पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, की जिल्ह्यातील काही मोजक्या शाळांमध्ये पोईप हायस्कूलचे नाव असून पोईप हायस्कूलचे संस्था संचालक सर्व शिक्षक यांनी पोईप हायस्कूलच्या यशात नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. पोईप हायस्कूलचे विद्यार्थी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यांमध्ये नावारुपास येत आहेत याबद्दल आपण संस्था सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे अभिनंदन करतो. मागिल कित्येक वर्षांपासून पोईप हायस्कूल इमारत वर्ग खोल्यासाठी संस्था व ग्रामस्थांनी आपल्याकडे वेळोवेळी मागणी केली होती. मात्र शासकीय निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आपण खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून इमारतीसाठी चार वर्ग खोल्या बांधून देणार असुन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या चार वर्ग खोल्याचे भुमिपुजन करण्यात येणार आहे. यापुढेसुद्धा पोईप हायस्कूलसाठी सहकार्य करु असे दत्ता सामंत यांनी सांगितले.










