विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची परिपूर्ण माहिती घ्यावी, या सहलीच्या माध्यमातून प्रेरणा घेत जिल्ह्यातील एक विद्यार्थी अंतराळ संशोधक बनला, तरी या उपक्रमाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले. दरम्यान, भविष्यात जिल्ह्यातील विद्यार्थी ‘इस्त्रो’ प्रमाणेच ‘नासा’ सारख्या आंतराष्ट्रीय अंतराळ संस्थांचा अभ्यास दौरा करतील, यासाठी आपण अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेतील प्रयत्नशील राहू या, असे आवाहनही विशेष गुणवंत ४७ विद्यार्थी मंगळवारी त्यांनी केले. ‘इस्त्रो’ सहलीसाठी रवाना झाले.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे ‘इस्रो’ सहलीसाठी रवाना होणारे विद्यार्थी आणि शिक्षक होते. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कळमकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे आदींसह विद्यार्थी, पालक, शिक्षक ही अभिमानास्पद बाब आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ही ज्ञानवंतांची भूमी आहे. येथील विद्यार्थ्यांना रत्नागिरी येथे उभारलेले तारांगणसारखे अभ्यासपूर्ण उपक्रम दाखविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठीही प्राथमिक स्तरापासूनच घडविले पाहिजे. पुस्तके ज्ञानाबरोबरच अवांतर वाचन, चालू घडामोडी या विषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. ‘इस्त्रो’ सहलीला जाणारे सगळेच विद्यार्थी वैज्ञानिक किंवा अधिकारी होतील असे नाही, यासाठी विद्यार्थ्यांना लघु उद्योग व व्यवसायांचे प्राथमिक ज्ञानही शाळा स्तरावर दिले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा जागृत केली पाहिजे, असे आवाहन रवींद्र खेबुडकर यांनी केले. शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनीही विचार मांडले. या ‘इस्रो’ सहलीसाठी इ. ४ थी मधील २४ आणि इ. ७ वी मधील २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार वैज्ञानिक शिक्षण मिळावे, गोरगरीब ग्रामीण विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी मिळावी, इस्त्रो सारख्या वैज्ञानिक संस्थांची माहिती मिळावी, या हेतुने जिल्हा परिषदेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी प्रास्ताविकात या ‘इस्त्रो’ सहलीचे महत्त्व विशद केले.










