कुणकेरी-लिंगाचीवाडी रस्त्याच्या अर्धवट कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मनविसेच्या या मागणीची दखल…

सावंतवाडी

कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याबाबत मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी जि. प. चे उपअभियंता अंगद शेळके यांचे लक्ष वेधले. त्यानंतर श्री. शेळके यांनी कुणकेरी- लिंगाचीवाडी रस्त्यांची पाहणी करत उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन मनविसे पदाधिकाऱ्यांना दिले.
कुणकेरी-लिंगाचीवाडी रस्त्याच्या अर्धवट कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. उपअभियंता अंगद शेळके यांची भेट घेतली होती. सदर रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून अपघात होत असल्याची परिस्थिती केतन सावंत यांनी कथन केली. मनविसेच्या या मागणीची दखल घेत श्री. शेळके यांनी सदर रस्त्याचा जि. प. रस्ते आराखड्यामध्ये प्राधान्याने सामाविष्ट करून तो लवकरात लवकर कसा दुरूस्त करता येईल, याकरिता आपण प्रयत्न करु. तसेच तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनला कळविण्यात येईल, अशी ग्वाही श्री. शेळके यांनी रस्ता पहाणी वेळी दिली.
यावेळी निगुडे-नवीन देऊळवाडी येथील साकवासंदर्भात चर्चा करण्यात आली. या साकवाचे सचिन पालव हे ठेकेदार असून ते काम वेळेवर पूर्ण करत नसल्याची तक्रार आपण
जि. प. कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे असे श्री. शेळके यांनी सांगितले. आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर यांनी आपल्या भागातील रस्ते, शाळा दुरुस्ती याबाबत अधिकारी यांच्याशी चर्चा केली व सदर कामे मार्चपूर्वी तालुक्यातील सर्व कामे पूर्ण करा, कुठेही काम थांबता कामा नये. आपण आपल्या स्तरावर योग्य ती दखल घेऊन कामे पूर्णत्वास न्या, अशी मागणी उपअभियंता अंगद शेळके यांच्याकडे केली.
मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, उपतालुकाध्यक्ष राजेश मामलेदार, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर व हर्षद नाईक आदी उपस्थित होते.