क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा; बजरंग दलाचा इशारा….

कणकवली

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी बजरंग दलाने कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात आज आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव आदी घोषणाबाजी करत बजरंग दलाचे कार्यकर्ते व हिंदूवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आप्पासाहेब पटवर्धन चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. त्यानंतर नायब तहसीलदार मंगेश यादव यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनात बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख प्रसाद ठाकूर, बजरंग दलाचे कणकवली तालुकाप्रमुख नागेश मोगविरा, सहप्रमुख दिनेश सरुडकर, विश्व हिंदू परिषदेचे सुनील सावंत, जिल्हाध्यक्ष नंदकुमार आरोलकर, किशोर दाभोळकर, संजय पाताडे, राष्ट्र सेविका दलाच्या प्रतिभा करंबेळकर, गितांजली कामत, वैशाली कोरगावकर, संदेश सावंत-पटेल यांच्यासह हिंदूवादी संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.’औरंगजेब की कबर खुदेगी, शंभूराजे की धरती पर’, ‘औरंगजेब की कबर खुदेगी, शिवछत्रपती की धरती पर’, ‘एक धक्का और दो, औरंग्या की कबर तोड दो’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के सन्मान मै, बजरंग दल मैदान मै’, ‘छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान मै, बजरंग दल मैदान मै’, ‘औरंग्याची कबर उखडून काढा’, ‘औरंग्या के पिल्लो से, हम लढेंगे’, ‘हम लढेंगे, देश की रक्षा कौन करेगा, बजरंग दल’, ‘धर्म की रक्षा कौनकरेगा, बजरंग दल, बजरंग दल’, ‘जयकारा वीर बजरंगी’, ‘हर हर महादेव’, ‘वदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आप्पासाहेब पटवर्धन चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. छत्रपती संभाजी महाराज नगर शहरातील हिंदू द्वेष्टा, क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटविण्याची मागणीचे निवेदन त्यांनी नायब तहसीलदार मंगेश यादव निवेदन सादर केले. यावेळी सुनील सावंत यांनी उपस्थितांना केले. यावेळी सरकारने औरंग्याची कबर त्वरित हटवावी, अन्यथा हिंदूबांधव संभाजीनगरमध्ये जाऊन स्वतः कबर हटवतील, असा इशारा त्यांनी दिला.