रेल्वेखाली उडी घेत एका तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी प्रतिनिधी,

धावत्या मालवाहतूक रेल्वेखाली उडी घेत एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शनिवार, १५ रोजी रात्री ७.४४ वाजण्याच्या सुमारास घडली. बसुराज शरणप्पा कुडगी (वय ३८, रा. एमआयडीसी रेल्वे कॉलनीशेजारी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बसुराजने शनिवारी रात्री ७.४४ च्या सुमारास निवसर ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनदरम्यान येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलिसांत
आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.