चिपळूण
चिपळूण तालुक्यातील तोंडली वारेली या दुर्गम अशा गावात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने एका घरात शिरून घरातील व्यक्तीवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. यावेळी घरात अचानक बिबट्या शिरल्यानंतर घरातील व्यक्ती घाबरून गेल्या. अचानक हल्ला केल्याने या घरातील आशिष शरद महाजन हे गंभीर जखमी झाले. मात्र, त्यांनी न घाबरता धीटपणे बिबट्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रतिहल्ला चढवला. यामध्ये आशिष महाजन हे गंभीर जखमी झाले. बचावासाठी केलेल्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला.










