आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय नाट्यमहोत्सव !

सावंतवाडी,

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाऊंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ मार्च असा तीन दिवसीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ट्रीकसिनयुक्त दोन दशावतारी नाट्यप्रयोग तर एक ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे. शहरातील भोसले उद्यान समोर हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
परब यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, तालुका अध्यक्ष रवींद्र मडगावकर, प्रल्हाद तावडे, नंदू शिरोडकर, प्रताप परब, मोहिनी मडगावकर, विनोद सावंत आदी पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब. सोबत सुनील राऊळ आदी.
उपस्थित होते. श्री. परब म्हणाले, आ. राणे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने साजरा केला जाणार आहे. १५ ते १७ मार्च या तीन दिवसांत हे विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये गरजू लोकांना धान्यवाटप, रुग्णांना फळ व औषध वाटप तसेच हॉस्पिटलमध्ये बेडशीट वाटप आदी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. १५ रोजी कलेश्वर नाट्य मंडळ यांचा ‘जय जय रवळनाथ’
व १६ रोजी जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘कृष्णभक्त कुम्मनदास’ हे दोन ट्रीकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहेत. तर १७ रोजी गणेश ठाकूर दिग्दर्शित अफजलखान वधावर आधारित ऐतिहासिक नाट्य कलाकृती ‘नरसिंहशिवराय’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा व नाट्यपुष्पांचा नाट्यरसिकांनी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले.